Ramdas Athawale | (Photo Credit : Facebook)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मी बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर- Prakash Ambedka) यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे आणि मी हे संपूर्ण जबाबदारीने सांगत आहे, असे म्हटले आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale) हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यासोबतच आरपीआय (आठवले गट) (RPI(A) )  प्रमुखही आहेत. त्यामुळे आठवले यांच्या भूमिकेमुळे दलीत चळवळीत चर्चा सुरु झाल्या आहेत. ते मुंबई येथे बोलत होते. रामदास आठवले यांनी घेतलेल्या भूमिका अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.  विविध मुद्द्यांवर तत्कालीक कविता आणि प्रतिक्रिया देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

रामदास आठवले यांनी या वेळी बोलताना म्हटले की, आरपीआयचे अनेक गट आहेत आणि यामुळे समाजातील उपेक्षित वर्गात फूट पडत आहे. आरपीआयच्या सर्व गटांना एकत्र करण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला. दुसऱ्यांना आरपीआय अध्यक्ष बनवण्याची ऑफरही दिली पण तसे झाले नाही. (हेही वाचा, Ramdas Athawale Funny Poetry: रामदास आठवले यांच्या कविता ऐकून Chipi Airport वर उपस्थितांना आवरेना हसू (Video))

ट्विट

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना रामदास आठवले यांनी म्हटले की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढतील असे मला वाटते. अशा परिस्थितीत भाजपने आरपीआयसोबत युती केल्यास आमची सत्ता येण्याची पूर्ण शक्यता आहे. गेल्या वेळीही भाजप-आरपीआय युतीला 82 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. मी महापौरपदाबद्दल बोलणार नाही, पण जेव्हा आमची सत्ता येईल (बीएमसी निवडणुकीत) तेव्हा मुंबई उपमहापौर आरपीआयचा असेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.