Mumbai Water Cut: पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे 22-23 डिसेंबर दिवशी BMC कडून पाणी कपात जाहीर; इथे पहा कुर्ला, घाटकोपर भागात कोणत्या भागात होणार परिणाम
Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

बृहन्मुंबई महानगर पालिकेने (BMC) मुंबईकरांना पुढील काही दिवस पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान येवई (Yevai) येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटची (Chlorine Injection Point)  दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय जवळ मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या काम बीएमसीने हाती घेतल्याने हा पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. बीएमसी कडून हे काम 22 डिसेंबर दिवशी सकाळी 10 वाजता सुरू होती. पुढील 24 तास या कामासाठी लागणार असल्याने 23 डिसेंबरच्या सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईच्या काही भागात 15% पाणीकपात तर काही ठिकाणी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटची दुरुस्ती दरम्यान आग्रा रोड व्हॉल्व कॉम्प्लेक्स आणि पोगावा या भागात 2750 मीमी व्यासाच्या पाईपलाईनवर काम होणार आहे. सोबतच मुंबई महानगर पालिका घाटकोपर उच्चस्तर जलाशय मधील 1400 मीमी व्यासाची मुख्य पाईपलाईन बदलणार आहे. CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही- मुंबई महानगरपालिका.

बीएमसी ट्वीट

बीएमसीच्या माहितीनुसार, घाटकोपर आणि कुर्ला भागात N आणि L wards मध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाईल. तर A, B, C, D, E, G-North, G-West, H-East, H-West, K-East, K-West, P-North, P-South, R-North, R-South, L, N, S या विभागांमध्ये 15% पाणीपुरवठा मंगळवार, 22 डिसेंबर आणि बुधवार 23 डिसेंबर दिवशी कमी होणार आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील या भागातील नागरिकांना पुढील 2 दिवसांसाठी तोग्य घरगुती पाणीसाठा करण्याचं तसेच पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन केले आहे.