BMC: मुंबई महापालिका गटनेते यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी; शिवसेना नगरसेवक रडारवर असल्याची चर्चा
Shiv Sena leader Yashwant Jadhav | (Pic Credit - ANI)

शिवसेना नगरसेवक ( Shiv Sena) मुंबई महापालिका गटनेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडी (ED) अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे. मुंबई येथील यशवंत जाधव यांचे निवासस्थान असलेल्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा आणि सीआरपीएफ जवान पोहोचले आहे. जवानांचा बंदोबस्त घराबाहेर आहे. तर तपास यंत्रणांचे अधिकारी घरी पोहोचल्याचे समजते. दरम्यान, यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणा नेमकी कोणती चौकशी करत आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुक आहे. त्यामुळे सत्तेत असलेली शिवसेना आणि इतर सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय मोर्चेबांधीणस सुरुवात होते आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा सक्रीय झाल्या असून अनेक प्रमुख नेत्यांच्या घरांवर धाडी टाकल्या जात असल्याचे समजते. या धाडीच्या निमित्ताने शिवसेनेला केंद्राकडून इशारा दिला जात असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा Nilofar Malik On Nawab Malik: नवाब मलिक बेधडक बोलतात म्हणून ईडी आणि एनसीबी आमच्या मागे आहेत, निलोफर मलिकांची प्रतिक्रिया)

महाविकासआघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने नुकतीच अटक केली. नवाब मलिक यांना अटक करण्यात आली त्या दिवशी पहाटेच केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर नवाब मलिक यांना इडीचे अधिकारी सोबत घेऊन कार्यालयात गेले. त्यानंतर सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. या धाडीमध्येही अशाच प्रकारचा काहीसा पॅटर्न पाहायला मिळते आहे.