Mumbai: मुंबईत पुन्हा एकदा आढळा Black Fungus चा रुग्ण
Black fungus (Photo Credits: Facebook)

Mumbai: मुंबईत सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत आहे. अशाच आता ब्लॅक फंगसच्या रुग्ण आढळून आला आहे. तर 70 वर्षीय महिलेने कोरोनाची चाचणी केली असता ती 5 जानेवारीला पॉझिटिव्ह आल्याचे दाखवले गेले. तिच्यामध्ये ब्लॅग फंगसची सुद्धा लक्षणे दिसून आली.(Ajit Pawar On Wine Decision: वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक सरकारला बदनाम करत आहेत-अजित पवार)

महिलेला उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून आले होते. कोविड19 वर मात केल्यानंतर ही काही जणांना ब्लॅक फंगसचे संक्रमण झाले होते. या आजारामुळे काही लोकांच्या डोळ्यांवर भयंकर परिणाम झाला होता. तसेच काही जणांना आपला जीव गमवावा लागला.(Corona Virus Update: कोरोना परिस्थिती नियंत्रणात, ओमिक्रॉनच्या पुढील प्रसाराला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज, महाराष्ट्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती)

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये हळूहळू घट होत आहे. शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे आणखी 1312 रुग्ण आढळले. तर कोरोनावर मात करणाऱ्याचा दरात वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे. या काळात 36708 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे. राज्यात 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान,राज्यात कोरोना  प्रतिबंधासाठी सुरु असलेला मास्कचा वापर थांबवून, मास्क मुक्ती करावी की करू नये याबाबत राज्याच्या कोविड विषयक कृती दलानं विज्ञानिष्ठ अभ्यास करावा, त्याआधारे निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.