प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते चुनाभट्टी (Chunabhatti) ला जोडला जाणारा लिंक रोड येत्या शनिवारी म्हणजेच 9 नोव्हेंबरला वाहतुकीसाठी खुला होणार आहे. टाईम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या कित्येक मुंबईकर जो पूल सुरु होण्याची वाट पाहत होते ते पूल लवकरच वाहतुकीसाठी सुरु होणार असल्याने मुंबईकरांमध्ये आनंद गगनात मावेनासा झालाय. ट्रॅफिक च्या बाबतीत मुंबईतील अव्वल स्थानावर असलेले ठिकाण बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स. येथे बहुतेक ऑफिसेस असल्याने येथे नेहमीच लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. त्यामुळे बीकेसी-चुनाभट्टी मार्गे प्रवास करणारे लोक या पूलाची गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते.

या पूलाचे भूमिपूजन एप्रिल 2015 साली झाले होते. या पूलामुळे आता बीकेसी-चुनाभट्टी हा प्रवास केवळ 30 मिनिटांत पार करता येणार आहे. या मार्गे प्रवास करणा-या लोकांना धारावी आणि बांद्रे पूर्व येथे नेहमीच ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता. या पूलामुळे ही समस्या आता कायमची दूर होणार आहे असच म्हणावं लागेल.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक संतप्त; चुनाभट्टी-बीकेसी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची केली मागणी

या पूलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे. या पूलावर ध्वनिविरहित बॅरियर्स, डिवायडर्स लावण्याचे काम सुरु आहे. सुरुवातीच्या काळात या प्रोजेक्टची किंमत 261 कोटी होती जी आता 203 कोटी पर्यंत आली आहे.

चुनाभट्टी-बीकेसी उड्डाण पूल बांधून अनेक महिने उलटले तरी, वाहतुकीसाठी खुला करत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार नबाब मलिक यांनी मागील महिन्यात आक्रमक भुमिका घेतली होती. सरकारला या पुलाचे उद्घाटन करुन जनतेसाठी खुला करायचा नसेल तर, तो आम्ही खुला करु असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच नवाब मलिक यांनी चुनाभट्टी- बीकेसी पुलाकडे गेल्यानंतर जेसीबीवर उभा राहून त्यांनी आंदोलनदेखील केले होते. नवाब मलिक यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि स्थानिकांनीही या अंदोलनात सहभाग घेतला होता.