File image of BJP MP Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असल्याचे दिसत आहे. नुकतेच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात मुंबईतील (Mumbai) वेगवेगळ्या रुग्णालयातून कोरोनाबाधितांचे 6 मृतदेह गायब झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. एवढेच नव्हेतर, हे सर्व मृतदेह कोणकोणत्या रुग्णालयातून गायब झाले आहेत, याचीही माहिती दिली आहे. तसेच त्यांची नावे देखील शेअर केली आहे. यामुळे संपूर्ण मुंबई परिसरातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून गायब झालेल्या मृतदेहांची सिवस्तर माहिती दिली आहे. तसेच, हे मृतदेह कोणत्या रुग्णालयांतून गायब झाले याचीही माहिती दिली आहे. या तपशीलासह सोमय्या यांनी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यांचे मृतदेह रुग्णालयातून गायब होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या मन:स्थितीचा विचार करून सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. हे देखील वाचा- सोनू सूद, तू संजय राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष कर; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे ट्वीट

रुग्णालातून गायब झालेल्या कोरोनाबाधितांच्या मृतदेहांची यादी-

1) सुधाकर खाडे- केईएम रुग्णालय

2) मेहराज शेख- राजावाडी रुग्णालय (घाटकोपर)

3) विठ्ठल मोरे- शताब्दी रुग्णालय ( कांदिवली)

4) मधुकर पवार- नायर रुग्णालय

5) राकेश शर्मा- जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय

6) ग्यांतीदेवी विश्वकर्मा- लोकमान्य टिळक रुग्णालय (सायन)

किरीट सोमय्या यांचे ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 85 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी 40 हजारांहून अधिकजण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णाचे प्रमाण अधिक असल्याने राज्यातील नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाला आहे.