Nitin Raut In Nagpur| Photo Credits: Twitter/ANI

विविध प्रकरणांवरु राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अडचणीत आल्याचे या आधीही दिसले आहे. आता आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करुणा शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अनिल राठोड हे मंत्री अडचणीत आले होते. आता भाजपने (BJP ) उर्जामंत्री (Energy Minister) नितीन राऊत (Nitin Raut ) यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दिल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार भाजपचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी ही तक्रार दाखल केली आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Rau यांनी चार्टर्ड विमान वापर प्रकरणात ही तक्रार दाखल केली आहे.

मुंबई येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात विश्वास पाठक यांनी आपली तक्रर दाखल केली आहे. या तक्रारीत उर्जमांत्री नितीन राऊत यांनी गेल्या वर्षी कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी लॉकडाऊन असताना राज्य सरकारचे चार्टर्ड विमान खासगी प्रवासासाठी वापरले होते. नियमानुसर अशा प्रकारे विमान वापर करायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांची रीतसर परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी न घेताच नितीन राऊत यांनी विमान वापरल्याचे पाठक यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याचे समजते. (हेही वाचा, Sharad Pawar On Maha Vikas Aghadi Government: महाविकासआघाडी सरकार स्थिर, कोणताही धोका नाही: शरद पवार)

दरम्यान, नितीन राऊत यांनी राज्य सरकारचे चार्टर्ड प्लेन वापरुन प्रवास केल्याने त्याचा आर्थिक फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे, असे तक्रारदारांचे म्हणने आहे. तक्रारीत उल्लेखानुसार उर्जामंत्र्यांनी केलेला विमान प्रवास खालीलप्रमाणे.

प्रवास दिनाक: 6 जुलै 2020

प्रवास मार्ग: मुंबई-नागपूर मुंबई

प्रवास खर्च: 8 लाख 35 हजार रुपये

प्रवास दिनाक: 9 जुलै 2020

प्रवास मार्ग: औरंगाबाद-मुंबई-नागपूर-दिल्ली

प्रवास खर्च: 9 लाख 25 हजार

प्रवास दिनाक: 13 नोव्हेंबर 2020

प्रवास मार्ग: हैदराबाद-मुंबई-नागपूर-हैदराबाद

प्रवास खर्च: 11 लाख 50 हजार रुपये

विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषद घेऊन उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच, ट्विट करुन काही कागदपत्रंही ट्विट केली आहेत. खासगी कामासाठी मंत्र्यांना विमान उपलब्ध करुन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, असेही पाठक यांनी म्हटले आहे.