कोल्हापुरात निवडणूक जिंकली नाही तर हिमालयात (Himalayas) जाईन, अशी घोषणा करणे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कोल्हापुरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील (Jitendra Awhad) यानी आता हिमालयात जावे असे म्हणत विरोधकांनी टोलेबाजी सुरु केली आहे. महाविकासआघाडीतील मंत्री आणि काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरवर एक फोटो शेअर करत चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सकडूनही चंद्रकांत पाटील यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील यांचा मॉर्फ केलेला एक फोटो जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट केला आहे. या फोटोत चंद्रकांत पाटील हे मांडी घालून समाधीअवस्थेत बसले आहेत. पाठिमागे हिमालयाच्या पर्वतरांगाही दिसत आहेत. या फोटोवर एक कॅप्शनही आहे. त्यात म्हटले आहे, 'मी पोहोचलो रे हिमालयात'. हा फोटो ट्विट करताना 'नको परत या' अशी सादही जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांना पोस्टच्या माध्यमातून घातली आहे. (हेही वाचा, Kolhapur Election Result 2022: कोल्हापूरात महाविकासआघाडीचा डंका, जयश्री जाधव विजयी; भाजपचा दणदणीत पराभव)
नको परत या .. pic.twitter.com/JL89jsfRxb
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 16, 2022
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याने तर चक्क कमालच केली आहे. या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांचे थेट हिमालयाचेच तिकीट काढले आहे. या कार्यकर्त्याने कोल्हापूर ते हरीद्वार असे चंद्रकांत पाटील यांचे रेल्वेचे एसीचे तिकीट काढले आहे. या तिकीटामध्ये मोफत जेवणाचीही सोय आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना उन्हाचा त्रास होऊ नये. म्हणून आम्ही प्रवासात त्यांची काळजी घेत आहोत. त्यांनी आनंदाने हिमालयात जावे. आम्ही वेळ न दवडता हे तिकीट चंद्रकांत पाटील यांच्या घरी कुरीअरने पाठवणार आहोत, असेही या कार्यकर्त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.