कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा रोग भाजपाला जडला आहे- बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat | (Photo Credit: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ही चित्र खूपच धक्कादायक आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद आहेत. आज सकाळी नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते नेमकी काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मोदींनी लोकांच्या मनता असलेल्या लॉकडाऊन चा काळ वाढवण्याची घोषणा न करता एक वेगळीच घोषणा केली. ज्यात 5 एप्रिल रात्री 9 वाजता लोकांना दरवाजाजवळ दिवे लावा आणि घरातील दिवे बंद करण्यास सांगितले आहे. मोदींच्या या उपक्रमाचे काहींनी स्वागत केले तर विरोधकांनी मात्र जोरदार हल्ला बोल केला. यावर टीका करत कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा रोग भाजपाला जडला आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मोदी आणि समस्त भाजप पक्षावर आगपाखड केली आहे. दिवे लावा, टाळ्या वाजवा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नसून त्यांनी आतातरी गंभीर व्हायला हवे, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे. Coronavirus in India: 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा, कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी एकजूट दाखवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- Coronavirus विरुद्धच्या लढ्यासाठी एकत्रित येऊन 5 एप्रिल रोजी दिवे लावण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून स्वागत

“राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाला एका कणखर व जबाबदार नेतृत्वाची गरज असते दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे ते नाही. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा एक रोगच त्यांना लागला आहे. याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीवेळीही इव्हेंट करुन परिस्थीतीचे गांभीर्य घालवले जात आहे,” असेही थोरातांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे प्रज्ज्वलित करण्याचे करण्याचे आवाहन केले आहे.