Sharad Pawar (PC - ANI)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithivraj Chavan) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना भाजपने दोन मोठ्या पदांची ऑफर दिल्याची माहिती रविवारी सायंकाळी दिली. भारतीय जनता पक्षाने शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्री आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिल्याचे वक्तव्य चव्हाण यांनी केले.

चव्हाण यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, शनिवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुण्यातील व्यापारी अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटीलही उपस्थित होते. या बैठकीमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांना ऑफरबद्दल माहिती दिली. चोरडिया हे शरद पवार यांचे दीर्घकालीन मित्र आणि व्यावसायिक सल्लागार आहेत.

माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांच्या मार्फत शरद पवार यांना ही दोन मोठी पदे देण्यात आली होती. मात्र अजितदादांनी दिलेली ऑफर पवार साहेबांनी स्वीकारलेली नाही. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह अजित पवार शरद पवार यांच्यापासून दूर गेल्यापासून ते शरद पवार यांच्याशी संपर्क आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी संध्याकाळची भेट ही राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची दोन्ही नेत्यांमधील तिसरी भेट होती.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी नुकतेच नवी दिल्लीत गेलेल्या अजितदादांना शरद पवार यांना या दोन पदांच्या ऑफरबद्दल माहिती देण्यास सांगितले होते. यासह, जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही आपल्यामध्ये सामावून घेण्याची ऑफर भाजपने दिल्याचे चव्हाण म्हणाले. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडणारा भाजप पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात अधिक राजकीय जागा व्यापण्यासाठी शरद पवारांनाही आपल्यासोबत घेण्यास उत्सुक आहे. (हेही वाचा: Sanjay Raut On Priyanka Gandhi: प्रियांका गांधी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध लढल्या तर निश्चित विजयी होतील; संजय राऊत यांचा दावा)

दरम्यान, अजित पवार आणि काका शरद पवार यांच्यात वारंवार होणाऱ्या भेटीमुळे ‘इंडिया’ गटात कमालीची अस्वस्थता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये होत असलेल्या भेटीमुळे शिवसेनाही चांगलीच नाराज आहे. काका-पुतण्यांच्या भेटींना त्यांनी मान्यता दिली का? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, 'या बैठका किती योग्य आहेत, हे शरद पवारांनाच ठरवायचे आहे.' शिवसेनेचे (यूबीटी) संजय राऊत यांनी सांगितले की, या बैठकांमध्ये काहीही गैर नाही. 'नरेंद्र मोदी नवाझ शरीफ यांना भेटलेच होते की,'