Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Sanjay Raut On Priyanka Gandhi: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून (Varanasi) पंतप्रधान मोदींविरोधात (PM Narendra Modi) लोकसभा निवडणूक लढवली तर त्यांचा विजय निश्चित आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

एवढंच नाही तर संजय राऊत यांनी वाराणसीतून प्रियांका गांधींच्या विजयाचा अंदाज तर लावलाच, पण अमेठी-रायबरेलीमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवी लढत दिली जाईल, असा अंदाजही व्यक्त केला आहे. संजय राऊत यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रविवारी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांच्या पत्नीचे कौतुक करताना म्हटले होते की, प्रियंका यांच्याकडे संसद सदस्य होण्यासाठी सर्व पात्रता आहेत. (हेही वाचा -Sharad Pawar On BJP: माझा पक्ष भाजपबरोबर जाणार नसून या पक्षासोबत कोणताही संबंध राष्ट्रवादीच्या राजकीय धोरणात बसत नाही; शरद पवार यांची स्पष्टोक्ती)

रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, प्रियंका गांधी यांनी संसदेत यावे, त्या उत्तम काम करतील. ते पुढे म्हणाले, 'ती संसदेत गेली तर मला आनंद होईल. मला आशा आहे की काँग्रेस पक्ष त्यांचा स्वीकार करेल आणि त्यांच्यासाठी चांगली योजना तयार करेल.' पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

याआधी काँग्रेस प्रियंका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकते. प्रियांका गांधी पुढील लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असं म्हटलं जात आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये त्यांनी प्रियंका गांधींच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले, दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. प्रियंका गांधी लवकरच मोठ्या भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी त्यांना यूपीचे प्रभारी बनवण्यात आले होते.