Nitesh Rane | (Photo Credits: Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील विविध ठिकाणी शिवसेना-भाजपच्या (ShivSena-BJP) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्याचबरोबर मुंबई मधील राणे यांच्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर युवासेनेतील काही पदाधिकाऱ्यांना बढती दिल्याचे भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. याचा पुरावा म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा खास फोटोही शेअर करण्यात आला आहे.

या फोटोत एका बाजुला राज्याचे पर्यटनमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे एका व्यक्तीसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे एका व्यक्तीला पोलीस मारहाण करताना दिसत आहेत. या दोन्ही व्यक्ती म्हणजे युवासेनेचा कार्यकर्ता असल्याचे नितेश राणे यांचे म्हणणे आहे. राणेंच्या बंगल्याबाहेर मार खाणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी तो एक होता, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलेल्या मजूरातून दिसून येतं. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती. आज पण राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात. सिर्फ नाम ही काफी है."(Narayan Rane: जामिन मिळाल्यानंतर नारायण राणे, नितेश राणे यांची ट्विटरवरुन प्रतिक्रिया)

Nitesh Rane Tweet:

उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीकेची ही एक संधी न सोडणाऱ्या नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर शिवसैनिक पेटून उठले. नारायण राणे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या घराबाहेर आंदोलनं झाली. मात्र राणे यांची सुटका झाल्यानंतर ठाकरे कुटुंबियांवर शाब्दिक वार करण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे.