Narayan Rane: जामनी मिळाल्यानंतर नारायण राणे, नितेश राणे यांची ट्विटरवरुन प्रतिक्रिया
Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर राणे समर्थक आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, कोर्टात जामीन मिळताच नारायण राणे यांनी रात्री उशीरा ट्विटरवरुन ट्विट करत प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांनी ट्विटरवर 'सत्यमेव जयते' असे केवळ दोनच शब्द लिहिले. दरम्यान, राणे यांचे चिरंजीव नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही ट्विटरवर राजनीति (Raajneeti) चित्रपटातील व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) 'करारा जवाब मिलेगा' हा डायलॉग बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड येथील कोर्टाने जामीन मंजूर केला आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वत्र जल्लोष केला. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र नारायण राणे यांनी 'सत्यमेव जयते' असं दोन शब्दांचं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटक करण्यात आली होती. राणे यांच्या अटकेची प्रक्रिया संपूर्ण दिवसभर राबवली गेली. अखेर सायंकाळी राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना महाड कोर्टासमोर हजर करण्यात आले. महाड कोर्टाने सरकारी बाजू आणि नारायण राणे यांची बाजू वकीलांच्या मार्फत जाणून घेतली. त्यानंतर कोर्टाने राणे यांना सशर्थ जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यावर विशेष कोणतीही प्रतिक्रिया देताना राणे यांनी ट्विटरवर केवळ 'सत्यमेव जयते' असे दोन शब्द ट्विट करत मर्यादित प्रतिक्रिया दिली. (हेही वाचा, Narayan Rane यांना जामीन मंजूर झाल्यानंतर Pravin Darekar यांची पहिली प्रतिक्रिया)

ट्विट

ट्विट

नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांनी मात्र ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. नारायण राणे यांच्या जामीनानंतर नितेश राणे यांनी 'राजनिती' चित्रपटातील मनोज वाजपेयी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान आगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा कोकणात पाहायला मिळू शकतो. या आधीही महाराष्ट्राने हा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळाला आहे.