Geeta Jain: मीरा-भाईंदरमध्येही भाजपला मोठा झटका बसण्याची शक्यता; अपक्ष आमदार गीता जैन उद्या शिवसेनेत करणार प्रवेश
Gita Jain (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ होताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांचा ओघ आता उलटा फिरल्याचे दिसत आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. यातच भाजपच्या माजी नेत्या गीता जैन (Geeta Jain) उद्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे  मीरा-भाईंदर (Mira Bhayandar) मतदारसंघात भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे. तर, गीता जैन यांच्यामुळे शिवसेनेचे ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

गीता जैन यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. भाजपच्या त्या माजी महापौरदेखील होत्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता जैन या शिवसेने प्रवेश करणार आहेत. तसेच उद्या दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर त्या आपल्या हातावर शिवबंधन बांधणार आहेत, अशी माहिती प्रसारमांध्यमांत झळकत आहे. हे देखील वाचा- माळी समाजाचे ओबीसी नेते अनिल महाजन यांचा भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी पदाचा राजीनामा

मीरा-भाईंदर महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भारतीय जनता पक्षाकडे एकूण 61 नगरसेवकांचे बळ आहे. तर, शिवसेनेकडे 22 आणि काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे 48 नगरसेवकांची आवश्यकता आहे. परंतु, गीता जैन गीता जैन यांच्यासोबत भाजप नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यास मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ता बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.