माळी समाजाचे ओबीसी नेते अनिल महाजन यांचा भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी पदाचा राजीनामा
OBC Leader Anil Mahajan | File Photo

महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ओबीसी-बहुजन नेते अनिल महाजन (Anil Mahajan)  यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षातून ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला आहे.

अनिल महाजन हे खडसे समर्थक आहेत. माजी महसूल मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे अतिशय निकटवर्तीय महाजन हे मानले जाणारे आहेत. अनिल महाजन यांनीसुद्धा भाजपाला आज सोडचिट्टी दिली आहे. अनिल महाजन यांनी माळी समाजाचे ओबीसी समाजाचे एक कुशल संघटन राज्यात उभे केले आहे.राज्यभर एक वेगळी ओळख महाजन यांनी निर्माण केली आहे.ओबीसीचे अनेक कार्यकर्ते लवकरच भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी सुत्रांची माहिती आहे.

'मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. तरी पक्ष नेतृत्वाने त्वरित राजीनामा स्वीकारवा ही नम्र विनंती असे पत्रकात अनिल महाजन यांनी म्हटले आहे.

आता शरद पवार यांच्या उपस्थिती एकनाथ खडसे यांचा मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. यावेळेसही एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.