Thane BJP MLA Shootout CCTV: भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा गोळीबार करतानाचा Video व्हायरल; पाहा सीसीटीव्ही फुटेज
Ganpat Gaikwad Shootout Case | (Photo Credits: YouTube)

Ganpat Gaikwad Shootout Case: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad Shootout CCTV) यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षाचे स्थानिक नेते महेश गायकवाड आणि त्यांचा एक मित्र गंभीर जखमी झाला. महेश आणि त्यांच्या मित्रावर ठाणे येथील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या एकूणच प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्रालयाने पोलीस दलाला दिली आहेत. त्यासाठी एका विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज (BJP MLA Ganpat Gaikwad Shootout CCTV Footage) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

इंटरनेटवर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

सांगितले जात आहे की, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर व्हायरल झालेले हे सीसीटीव्ही फुटेज  उल्हासनगर  येथील हिल पोलीस स्टेशनमधील एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या दालनातील आहे. ज्यामध्ये आमदार  गणपत गायकवाड हे काही इसमांवर जवळून नेम धरुण गोळीबार करताना दिसत आहेत. सुरुवातीला कोणाला काही कळण्या आधीच आमदार गावड अंदाधुंद गोळीबार करतात. आपल्या बंदूकीतून ते चार राऊंड फायर करताना दिसतात. तोपर्यंत बाहेरील काही लोक केबिनमध्ये धावत येतत. तिथे असलेल्या परंतू बाहेरुन आलेल्या आणखी एका व्यक्तीच्या हातातात पिस्तूल पाहायला मिळते. (हेही वाचा, Sanjay Raut On Ulhasnagar Firing: उल्हासनगर गोळीबारासाठी एकनाथ शिंदे जबाबदार; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाना)

जमीनीच्या वादातून गोळीबार

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील जमिनीच्या वादातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ही घटना घडलेल्या पोलीस ठाण्यात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा, Thane BJP MLA Shootout Case: 'महाराष्ट्रात गँगवॉर, भाजपला सत्तेची मस्ती', आमदार गोळीबार प्रकरणावरुन सुप्रिया सुळे आक्रमक)

आरोपींना कोर्टात प्रत्यक्ष हजर करा- कोर्ट

उल्हासनगर पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलिसांध्ये हजर केले. मात्र, कोर्टाने आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर करा. प्रकरणातील गांभीर्य पाहता त्यांना कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर करा, असे कोर्टाने आदेश दिले. त्यानंतर सुनावणी थांबली असून पोलीस आरोपींना कोर्टामध्ये प्रत्यक्षात हजर करणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Kalyan Firing: माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार, उल्हासनगरमध्ये खळबळ)

व्हिडिओ

'होय, मी गोळीबार केला'

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना 'होय, मी गोळीबार केला. मनस्तापातून हे कृत्य मी केले. त्यांनी (महेश गायकवाड) पोलीस स्टेशनमध्येच माझ्या मुलाला मारहाण केली. मुलाला मारहाण होत असताना मी स्वस्त बसू शकत नाही. त्यांनी माझ्या जागेचा जबरदस्तीने ताबा घेतला. हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरदहस्ताने होत आहे. याबाबत मी वरिष्ठांनाही वेळोवेळी कल्पना दिली आहे. शिंदे हे राज्यात गुन्हेगारी पसरविण्याचे काम करत आहेत. शिंदेसारखे मुख्यमंत्री जर महाराष्ट्राला लाभले तर राजयात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या लोकांनाही शिंदे यांनी गुन्हेगार केले. माझा मनस्ताप झाला म्हणूनच मी फायरींग केले. त्याला जीवे मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण, माझा मनस्ताप वाढला होता', असे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी दिले आहे.