Raosaheb Danve Kicks Man: भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) त्यांच्या बिंधास्त वागणूकीसाठी नेहमीचं चर्चेत असतात. ते कधी कोणाला काय बोलून जातील याचा नेम नसतो. सध्या ते विधानसभा निवडणुकीसाठी(Vidhan Sabha Election 2024) संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. जालना विधानसभा मतदार संघात भोकरदन येथे त्यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar)हे उमेदवार आहेत. त्यांचा रावसाहेब दानवे यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. लोकसभा निवडणूकांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी आली होती. ती दूर करत दोन्ही नेत्यांनी छान संवाद साधत फोटो काढले. मात्र, सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या एकाला रावसाहेब दानवे यांनी थेट लाथ मारून बाहेर (Raosaheb Danve Kicks Man)केले. या घटनेचा व्हिडीओ वाऱ्यासारखा प्रचंड व्हायरल झाला आहे.
अनेकांनी व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यावर संतापजनक कमेंट्सचा भडीमार पहायला मिळत आहे. दरम्यान, 'रावसाहेब दानवे हा माज बरा नव्हे', 'फोटो काढताय तो पण तुम्ही एका गद्दारासोबतच हे लक्षात ठेवा','सामान्य जनतेला अशी लाथ मारणे चांगले नाही. लोकसभेचा माज अजून उतरलेला दिसत नाही' अशा अनेक कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. (हेही वाचा: Raosaheb Danve on Maha Vikas Aghadi: रावसाहेब दानवे यांनी यांची भविष्यवाणी, महाविकासआघाडी सरकारबद्दल काय म्हणाले पाहा)
एखाद्या नेत्याच्या पुढे-पुढे करत असाल तर ते तुम्हाला किती तुच्छ लेखतात या videoमध्ये दिसून येईल. भाजपाचे नेते रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली. खोतकरांचा सत्कार सुरू असताना कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा video समोर #RaosahebDanve #ViralVideo pic.twitter.com/dKRe0mv0ji
— Pooja ujagare (@PoojaUjagare) November 12, 2024
अर्जुन खोतकर महायुतीकडून जालना विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. तर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्करराव यांनीही याच मतदासंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेतला गेला. दानवे आणि खोतकर यांच्यात अनेक दिवसांपासून नाराजी होती. मात्र, दोन्ही नेत्यांचे ही वर्तण पाहून मैत्री होत असल्याचे दिसले. मात्र. या भेटीने नव्या वादाला दिले हे नक्कीच आणि रावसाहेब दानवे यांची डोकेदुखी वाढली.