Raosaheb Danve on Maha Vikas Aghadi: रावसाहेब दानवे यांनी यांची भविष्यवाणी, महाविकासआघाडी सरकारबद्दल काय म्हणाले पाहा
Raosaheb Danve | (Photo Credits: Facebook)

महाविकासआघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Government) कधी पडणार याबाबत भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते दररोज नवे दावे करत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नुकताच पुन्हा एकदा नवा दावा केला आहे. येत्या दोन तीन महिन्यात सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. नव्या सरकारबाबत पत्रकारांना लवकरच कळवतो, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे यांच्याप्रमाणे भाजपच्या इतरही अनेक नेत्यांनी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारबाबत भाष्य केले आहे.

मराठवाडा पधवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारानिमित्त परभणी येथे बोलत असताना रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचाच आहे. तो नेहमीच आपला होता. परंतू, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेला. आता हा मतदारसंघ निवडूण आणत पुन्हा एकदा आपल्याकडे खेचायचा आहे. कारण या मतदारसंघातून जे आमदार आहेत त्यांनी कधीही पधवीधरांचे प्रश्न योग्य पद्धतीने मांडले नाहीत, असेही दानवे म्हणाले.

मराठवाडा पदवीधर मंतदारसंघात एकूण 35 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचा उमेदवार निवडूण आणण्यासाठी बूथ लेवलला जाऊन काम करायचे आहे. राज्यात कधीही एकमेकांचे तोंड न पाहणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. पण, हे सरकार येत्या दोन ते तीन महिन्यांत जाणार असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Prakash Ambedkar Criticizes Maharashtra Government: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण? उद्धव ठाकरे की अजित पवार? हे एकदा स्पष्ट करा; प्रकाश आंबेडकर यांची टीका)

दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही हे सरकार लवकरच जाणार आहे. सर्व जुळवाजुळव झाली आहे. आम्ही फक्त वाट पाहात आहोत, असे म्हटले आहे. राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सरकारबद्दल वक्तव्ये केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.