भाजपमध्ये गेल्या 40 वर्षांपासून असणारे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधी खडसे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत अनेक आरोप केले आहेत. याच आरोपांना आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपवर आरोप करण्यापेक्षा एकनाथ खडसे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा खोचक सल्ला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिला आहे. तसेच महाविकास आघाडीत एकनाथ खडसे यांना मंत्रीपद मिळावे, फक्त भाजपवर टीका करण्यासाठी त्यांना पक्षात घेतले जाऊ नये, असेही ते म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे यांनी आरोप करताना स्वत: केलेले उद्योग काय होते, याचा आधी विचार करावा. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा खडसेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर, त्याला आळा घालू शकत नाही. एखाद्यावर आरोप करणे अतिशय सोपे असते. परंतु, ते आरोप सिद्ध करणे खूप कठिण आहे. तसेच महाविकास आघाडीत एकनाथ खडसे यांनी मंत्रीपद मिळावे, फक्त भाजपवर टीका करण्यासाठी त्यांना पक्षात घेतले जाऊ नये, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Eknath Khadse Joins NCP: शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
एकनाथ खडसे त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.