Pankaja Munde (Photo Credits-ANI)

आज परळी (Parli) येथून गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त जोरदार तयारी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यासाठी हजारोच्या संख्यंने कार्यकर्त्यांनी उपस्थती लावत आज पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. तर 1 डिसेंबरला फेसबुकवरुन पोस्ट लिहिल्यानंतर आज अखेर त्यांनी तडफदार भाषण केले. पण भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी तेथे उपस्थितीत असलेल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची वाघीण म्हणून जोरदार घोषणा करण्यास सुरुवात केली. पंकजा यांनी भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना वंदन करत मी त्यांची मुलगी असल्याचा अभिमान व्यक्त केला.

आज गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी वाशिम, अमरावती आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे गडावर भाषण करण्यापूर्वी 1 डिसेंबरला फेसबुक पोस्ट लिहित स्वत:शी संवाद साधण्याचा वेळ हवा असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांच्या या पोस्टनंतर विविध प्रश्न राजकीय वर्तुळात सुरु झाल्याने त्या भाजप पक्ष सोडणार का असा सुद्धा सवाल उपस्थितीत करण्यात आला. तर गेल्या 12 दिवसानंतर पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यांनी भाषणामध्ये सुरुवातीलाच कोणचेही नाव न घेता भाजप पक्षाच्या नेतृत्वार टीका केली. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी प्रयत्न केले तरीही माझ्यावर बंड करणार असल्याचा आरोप लगावण्यात आला. तर बहुजन नेता झालेला कोणालाच आवडणार नाही असा मुद्दा सुद्धा पंकजा यांनी उपस्थितीत केला. माझ्या बंडाच्या बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घ्या असे ही त्यांनी गोपीनाथ गडावरुन म्हटले.(पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणूकतील पराभव घडवून आणलेला; गोपीनाथ गडावरील मेळाव्यात एकनाथ खडसेंचं भाजपा पक्षावर टीकास्त्र)

ANI Tweet:

पक्षाकडून कोणतेही पद मिळू नये म्हणून कारस्थान सुरु आहेत का असा सवाल त्यांनी भाषणादरम्यान उपस्थितीत केला. पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे पंकजा यांनी स्पष्ट केले. तर येत्या 26 जानेवारी 2020 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे कार्यालय सुरु केल्यानंतर महाराष्ट्रात मशाल घेऊन दौरा करणार आहे. त्यानंतर 27 जानेवारीला औरंबाद येथे लाक्षणिक उपोषणाची हाक पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन दिली आहे. हे उपोषण कोणाच्या विरोधात नसून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असणार आहे. तर नव्या सत्ता स्थापनेबाबत सुद्धा भाष्य करत पंकजा यांनी असे म्हटले आहे की, ज्यांनी बोलून दाखवलं ते केल. त्याचसोबत सरकारने गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारु नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. मात्र या नव्या सरकारने मराठवाड्यांच्या लोकांसाठी योगदान द्यावी अशी अपेक्षा केली आहे.