पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणूकीतील पराभव घडवून आणलेला; गोपीनाथ गडावरील मेळाव्यात एकनाथ खडसेंचं भाजपा पक्षावर टीकास्त्र
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook, File Photo)

पंकजा मुंडे यांचा विधानसभेतील पराभव घडवून आणल्याचं एकनाथ खडसे यांनी आज गोपीनाथ गडावरील मेळाव्यात  म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे जे भोगतंय ते मी जवळून पाहतोय, अनुभवत आहे असेही एकनाथ खडसे बोलताना भाजपा पक्षावर आरोप केले आहेत. दरम्यान पक्षाला सोठचिठ्ठी देण्याबाबत विचार करत असल्याचे सूचक विधान त्यांनी बोलताना केले आहे.  पक्षातून थेट हाकलपट्टी करण्याऐवजी मानसिक त्रास देत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. यावेळेस विधानसभा निवडणूकीमध्ये पंकजा मुंडे हीचा झालेला पराभव घडवून आणलेलं आहे. असे आरोप त्यांनी लावले आहेत. त्यासोबतच आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या  आठवणींना उजाळा देताना एकनाथ खडसे भावूक झाले.  एकनाथ खडसे भाजप सोडणार? राजकीय चर्चांना उधाण.

दरम्यान एकनाथ खडसे यांंनी आजची वेळ राजकीय भाष्य करण्याची नाही. परंतू एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध अत्यंत जवळचे होते. त्याची जाण ठेवून आज मी इथे आलो आहे. परळीकरांच्या प्रेमापोटी आज पंकजा मुंडे उभी आहे तिला साथ द्या असं आवाहन देखील एकनाथ खडसे यांनी आज केलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस 80 तासाचे मुख्यमंत्री कुणासाठी झाले होते? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळेस विचारला.  आपलं नेमकं काय चुकलं हेच अजून पक्षाकडून मला सांगितलं जात नाही अशी खंत देखील खडसेंनी बोलून दाखवली आहे.

गोपीनाथ गडावरील भाषणाच्या वेळेस सभास्थानी व्यासपीठावर भाजप नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळेस पंकजा मुंडे हीचा उल्लेख  वाघीण असा करत तिला पुढे जाण्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.