मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जोरदार फटकेबाजी केली. विरोधकांना सडेतोड उत्तरं देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला. दरम्यान, यावरुन भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी 'फूटपाथवरचा चणेवाला' असा उल्लेख मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. तर महाराष्ट्राच्या जनतेला अशा बिन्डोक व्यक्तीला सहन करावं लागणं हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "नेहमीप्रमाणे उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले. या माणसाची लायकी ग्रामपंचायतीमध्ये बोलण्या इतकी पण नाही पण दुर्देव म्हणावं महाराष्ट्राचे की महाराष्ट्राच्या जनतेला अशा बिन्डोक व्यक्तीला सहन करावं लागत आहे." (हे ही वाचा: महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या निलेश राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारले)
निलेश राणे ट्विट:
नेहमीप्रमाणे उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले. या माणसाची लायकी ग्रामपंचायतीमध्ये बोलण्या इतकी पण नाही पण दुर्देव म्हणावं महाराष्ट्राचे की महाराष्ट्राच्या जनतेला अशा बिन्डोक व्यक्तीला सहन करावं लागत आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 3, 2021
राणे कुटुंबिय शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, काल झालेल्या अधिवेशनातील सत्ताधारी आमदारांच्या भाषणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या आमदारांची भाषणं ऐकून चिंता वाटायला लागल्याचे त्यांनी म्हटले होते. तर संजय राठोड राजीनामा प्रकरणीही निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.