Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांचा राजीनामा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवला आहे का? भाजपचा खोचक सवाल
Sanjay Rathod, Nilesh Rane (Photo Credit: FB/ Twitter)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन (Pooja Chavan Suicide Case) महाराष्ट्रात वादंग उठले आहे. या घटनेला आज 24 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणांवरून भाजप आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 2 दिवस उलटले आहेत. मात्र, त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाही. त्यांचा राजीनामा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवला आहे का? असा प्रश्ना भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी विचारला आहे.

संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीरामा देऊन 2 दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाही. त्यांचा राजीनामा घरी किंवा मंत्रालयात फ्रेम करण्यासाठी ठेवला आहे का? पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला 25 दिवस होत आले तरी एफआयआर दाखल करून घेत नाहीत. राजीनामा मंजूर होत नाही. महाराष्ट्र हे कधीच विसरणार नाही, असे निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. हे देखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पुणे पोलिसांकडे सुपुर्त; 'या' कारणामुळे झाला मृत्यू

निलेश राणे यांचे ट्विट-

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पेटलेले असताना पूजाच्या कुटुंबियातही वादाची थिणगी पडल्याचे दिसत आहे. पूजा आत्महत्या प्रकरणात गप्प राहण्यासाठी तिच्या वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले आहेत, असा आरोप पुजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. मात्र, पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी हे आरोप फेटाळत शांतबाई यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.