Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पुणे पोलिसांकडे सुपुर्त; 'या' कारणामुळे झाला मृत्यू
Pooja Chavan (Photo Credit: Instagram)

Pooja Chavan Suicide Case: सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan) चा मृत्यू होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. मात्र, अद्याप तिच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समजू शकलं नाही. अशातंच आता पुणे पोलिसांच्या हाती पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट (Postmortem Report) आला आहे. या रिपोर्टमध्ये पूजाचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण सांगण्यात आलं आहे.

पूजाचा मृत्यू जबर दुखापतीमुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. इमारतीवरून उडी मारल्यानंतर पूजाच्या मणक्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला, असं शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केलं आहे. (वाचा - Sanjay Rathod: वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे जमलेल्या 10 हजार जणांवर गुन्हा दाखल)

पूजा चव्हाणने मागील महिन्यात पुण्यातील वानवडी येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणी भाजपने शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप लावले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर संजय राठोड यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, पूजाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडीलांनी कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. मात्र, भाजपने संजय राठोड यांना या प्रकरणी दोषी ठरवून त्यांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी केली होती.