Kirit Somaiya Tested Positive For COVID-19: भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण; पत्नीलाही संसर्ग
File image of BJP MP Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांसह अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यातच माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. “मी आणि माझी पत्नी डॉ मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. किरीट सोमय्या यांना कोरोना झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह परिवारातील 6 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण

किरीट सोमय्या यांचे ट्वीट-

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात आज आणखी 9 हजार 181 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 293 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 24 हजार 513 वर पोहचली आहे. यापैंकी 18 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.