Eknath Khadse Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapat

भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगर येथील कार्यकर्ते जोमाने तयारी लागले असून, एकनाथ खडसे यांची प्रतिमा असलेल्या पोस्टरवरुन कमळाचे चिन्ह गायब आहे. याशिवाय 'बांधाल ते तोरण, ठरवाल ते धोरण', 'आम्ही सदैव आपल्या सोबत' अशी वाक्येही या बॅनरवर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला दे धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे कोठेही जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतू, खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश येत्या गुरुवारी (22 ऑक्टोबर) होणार असे निश्चित मानले जात आहे.

एकनाथ खडसे हे भाजपमधील तगडे नाव. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, यांच्यानंतर एकनाथ खडसे यांचे नाव पक्षात अग्रक्रमाने घेतले जात असे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ खडसे यांनाच मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात असे. परंतू, आयत्या वेळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले आणि ते मुख्यमंत्रीही झाले. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात खडसे महसूल मंत्री आणि क्रमांक दोनचे मंत्री होते. मात्र, भोसरी येथील भूखंड प्रकरणाचे निमित्त जाले आणि खडसे यांची विकेट पडली. त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे पक्षातून बाजूला पडत गेले ते गेलेच. (हेही वाचा, Sharad Pawar On Eknath Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? स्वत: शरद पवार यांनीच दिले संकेत, काय म्हणाले पाहा)

दरम्यान, एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असे निश्चित मानले जात होते. प्रसारमाध्यमांतूनही तसे वृत्त झळकले होते. परंतू, काही कारणाने हा मुहूर्त टळला. आता येत्या गुरुवारचा (22 ऑक्टोबर) मुहूर्त निश्चित मानला जात आहे. त्यामुळे खडसे यांच्या समर्थकांना मुंबईला जाण्याचा सूचना देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.