कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रात (Maharashtra) अर्थिक संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वावरत असताना राज्यातील महसुली तूट भरून काढण्यासाठी मद्य विक्री सुरु करण्यात यावी, अशी मागणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. या वादात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनीही उडी घेऊन राज ठाकरे यांच्या भुमिकेला विरोध केला आहे. कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबल्याशिवाय देशी-विदेशी मद्याची दुकाने सुरू करू नयेत,अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. मद्य खरेदीसाठी गर्दी होईल शिवाय गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेचा पैसा मद्यावर खर्च झाल्याने सामाजिक व कौटुंबिक वातावरण बिघडेल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
राज्यात मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, या मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपकडूनही विरोध करण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत महाराष्ट्रातील देशी आणि विदेशी मद्याची दुकाने सुरु होता कामा नये, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ही दुकाने सुरु झाली तर मद्य विकत घेण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडेल. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होईल. यासोबतच काही सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या घरात पैसे येणे बंद झाले आहे. अशावेळी मद्याची दुकाने उघडायला परवानगी दिल्यास मध्यमवर्गीय घरांमधील पैसा उधळला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 96 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्वीट-
कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबल्याशिवाय देशी-विदेशी मद्याची दुकाने सुरू करू नयेत अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. मद्य खरेदीसाठी गर्दी होईल शिवाय गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेचा पैसा मद्यावर खर्च झाल्याने सामाजिक व कौटुंबिक वातावरण बिघडेल. #IndiaFightsCorona#StayHomeStaySafe pic.twitter.com/RnO6dTw5wr
— Chandrasekhar Bawankule (@cbawankule) April 25, 2020
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा उपरोधिकपणे समाचार घेण्यात आला होता. मात्र, महाविकास आघाडीचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या सुचनेचे समर्थन केले आहे.