
देशावर कोरोनाचे संकट वावरत असताना महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच राजकारण सुरु आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 20 लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईसाठी वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर करा, अशी मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या खोचक टिका केली आहे. देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? अशी विचारणा केली आहे. हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमी महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहेत. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. संजय राऊत यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागणीला आशिष शेलार यांनी विरोध दर्शवला आहे. नुकतेच आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल. तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या? हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!”. त्यावेळी आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांचा उल्लेख करणे टाळले आहे. हे देखील वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांना आजारपणाची नव्हेतर, विशेष रजा देण्यात यावी; मनसेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
आशिष शेलार यांचे ट्वीट-
देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल!
तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?
हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला! 1/2
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 14, 2020
“देशाच्या आर्थिक राजधानीचे महत्त्व टिकवणे महत्त्वाचे आहे. मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळे आर्थिक पॅकेज दिले पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. मुंबईतून 20 ते 25 टक्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईच नव्हेतर, मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे असेही संजय राऊत म्हणाले होते.