BJP's 2019 (Photo Credits: BJP/Twitter)

काँग्रेच पक्षाचे जेष्ठ नेते अमरिश पटेल (Amrish Patel) यांनी गेल्या दिवसांपूर्वी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. यातच धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल यांनाच विधान परिषद पोटनिवडणूक उमेदवारीचे तिकीट देण्यात आले आहे. यामुळे अमरिश पटेल यांच्या विरोधात कोणता उमेदवार उभा करायचा, असा प्रश्न काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षासमोर पडला आहे. या जागेसाठी येत्या 30 मार्चला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. 31 मार्चला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार 12 मार्च रोजी विधान परिषद पोटनिवडणूक उमेदवारीचे अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे.

धुळे नंदुरबार जिल्हा विधान परिषद सदस्य अमरिश भाई पटेल यांनी 1 ऑक्टोबर रोजी विधान परिषद सभापती राजे निंबाळकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अमरिश पटेल यांच्या विधान परिषद आमदारकीचा 2 वर्षाचा कालावधी बाकी होता. अमरीश पटेल हे काँग्रेसच्या तिकिटावर सलग 2 वेळा विधान परिषदेवर निवडून आले होते. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शिरपूर विधानसभेची जागा जिंकून आणली. त्यांच्या नेतृत्वात लढण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने एकहाती घवघवीत यश संपादीत केले. त्यांचे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील छोट्यामोठ्या लोकप्रतिनिधींशी पक्षापलीकडील संबंध आहेत. यामुळे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात त्यांना विजय मिळवता येईल, अशी शक्यता भाजपने व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी भागवत कराड यांना तर, शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसेभेची उमेदवारी

ट्वीट-

भाजपच्या वतीने उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यात अनुप अग्रवाल, विजय चौधरी यांची नावे आघाडीवर असली तरी उमेदवारीबाबत भाजपकडून अमरिश पटेल यांनाच उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत होते. आज अमरिश पटेल हे विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहितीसमोर आली आहे.