Devendra Fadnavis, Nawab Malik | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ड्रग्ज प्रकरणात आज अनेक गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार सुरू आहे. भाजपमधील अनेक नेत्यांचे ड्रग्ज विक्रेत्यांशी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावरुनही मलिक यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या टीकेनंतर भाजपमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. महाराष्ट्र भाजपतील अनेक नेते फडणवीस यांच्या बचावासाठी उतरले आहेत.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे की, 'यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्या आधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची अशाप्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसतेय.' (हेही वाचा, Maharashtra MLC By-Election 2021: विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी समोर आव्हान, भाजपच्या खेळीकडे लक्ष)

ट्विट

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे मात्र, आपल्या ट्विटमध्ये त्यांनी कोणाचेच नाव घेतले नाही. 'चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!' असे म्हटले आहे .

ट्विट

ट्विट

दरम्यान, स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, मलिक यांनी लवंगी फटाका फोडला. दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडणार आहोत. नवाब मलिक यांचे अंडर्वल्ड डॉनशी संबंध आहेत. त्याचे पुरावेच आपण शरद पवार यांना देणार आहो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.