प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

भाजप नगरसेविका शांता हिरे (BJP Corporator Shanta Hire Suicide) यांनी विष प्राशान करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांताताई या नाशिकमधील फुलेनगर परिसरातील प्रभाग 4 मधील नगरसेविका होत्या. त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, शांता यांनी विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.

शांता हिरे या गेल्या अनेक दिवसांपासून विविध आजारांनी ग्रासल्या होत्या. आपल्या नेहमीच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शांता या उत्तम नगरसेविका होत्या. नाशिकच्या विकासकामांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. शांता 2017 मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडणून आल्या होत्या. लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्या नेहमी तत्पर असतं. परंतु, आपल्या नेहमीच्या दुखण्याला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा - Dr. Payal Tadvi Suicide Case: डॉ. चिंग लिंग आणि डॉ. शिरोडकर यांना क्लीन चिट)

दरम्यान, शांता यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच नाशिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शांता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. नाशिक पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.