शिवसेनेला फसवलं, भाजपची चूक झाली; सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्ट कबुली
Sudhir Mungantiwar | Photo Credits: Twitter/ ANI

शिवसेनेला (Shivsena) विधानसभा काळात दिलेलं मुख्यमंत्री पदाचं वचन न पाळता आमच्या (BJP) कडून फसवणूक झाल्यानेच आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीला (NCP) झाला, शिवसेनेला फसवणं ही आमची चूकच पण ही चूक येत्या काळात सुधारू अशी स्पष्ट कबुली राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत मुनगंटीवार काल (गुरुवारी) बोलत होते. प्राप्त माहितीनुसार, त्यांनी महाविकासाआघाडी चे घटकपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसला इशारा देतानाच शिवसेनेला फसवल्याची कबुली दिली, "राज्यात कोणीही ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) तयार होऊ शकतो, आम्ही शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता, तर आज शिवसेनेसोबत आमची सत्ता असती, त्यामुळे आमच्या चुकीने तुमचा फायदा झाला आहे." असे मुनगंटीवार म्हणाले.

'भाजपाकडून मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती' राज्यसेभेतील उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्या होत्या, यावेळी मुख्यमंत्री पदावरून सुद्धा विषय झाला होता, मात्र निवडणुकांच्या नंतर यातील काही दिलेले शब्द आमच्या नेत्यांकडून वळवण्यात आले. त्यामुळेच शिवसेना आमच्यापासून वेगळी झाली आणि त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी केली, अशी कबुली मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्याच वेळी भविष्यात ही चूक नक्की सुधारू असाही विश्वास मुनगंटीवार यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला इशारा देताना, तुमचे तीन महिन्यापासूनचे संबंध असून आमचे 30 वर्षांचे संबंध असून महाविकास आघाडी सरकारचे आता 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या सरकारचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर हे सरकार कोसळेल, असेही मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.