Pune Porsche Car Accident Case: पुण्यातील पोर्शे अपघात दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे. एका अल्पवयीन मुलाने दोन निष्पापांचा जीव घेतला. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी बिल्डर बापाने आता पर्यंत अनेक पावले उचलेली आहे. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत अडकले गेले. त्यात त्याने दारूच्या नशेत वेगवान गाडी चालवली होती. या घटनेचे अनेक व्हिडिओ माध्यामांच्या हाती लागली. बारमध्ये बसून अल्पवयीन दारू पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. हेही वाचा- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड प्रकरणी अजून एक पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर अल्पवयीन आरोपीची दारूची चाचणी करण्यात आली होती.धक्कादायक म्हणजे अहवालात चाचणी नकारात्मक आली होती. त्यामुळे विरोधकांनी आवाज उठवला. या संदर्भात वरिष्ठांनी चौकशी सुरु केली. अल्पवयीन आरोपीची ब्लड सॅम्पल अदलाबदल केल्याचे समोर आले. या प्रकरणी ससून रुग्णालयातील एक शिपाई आणि दोन डॉक्टरांनी लाच घेतली होती. तीन लाखांसाठी डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल हे कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले गेले होते. त्यानंतर एका डॉक्टरांनी त्याचे सॅम्पल बदलले.
ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी सॅम्पलमधे बदल केल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले. आता पर्यंत या प्रकरणात आजोबा, वडिलासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी राजकाराणतील व्यक्तीने हस्तक्षेप केल्याची चर्चा समोर आली आहे. आरोपीचा वडिल विशाल अग्रवाल याने डॉ. अजय तावरे यांना ब्लड सॅम्पल बदल करण्यासाठी फोन केल्याचे कॉल्स डिटेल्समधून समोर आले आहे.