Coronavirus In Mumbai: मोठी बातमी! कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठे यश; नागरिकांकडून कौतूकाचा वर्षाव
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

देशात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असताना मुबंईकरांना (Mumbai) मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत आढळणाऱ्या दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली आहे. मुंबई आज 2 हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे, हे महानगरपालिकेसाठी (BMC) मोठ यश आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या या कामगिरीचे ट्विटरवर कौतूक केले जात आहे. या संकट काळात वैद्यकीय कर्मचारी, मुंबई महानगरपालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह अनेकजण आपला जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र झटणाऱ्या या सर्वांचे मुंबईकरांनी आभार मानले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आढळून आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मुबंईतील रुग्णांची संख्या चिंताजनक होती. परंतु, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कडक पावले उचलण्यात आली. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अटोक्या आणण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठ यश आले आहे. मुंबई आज 1 हजार 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 74 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबई कोरोनामुक्तच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. हे देखील वाचा- मुंबई महापालिकेकडून 50 लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जाणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

ट्विट-

ट्विट-

ट्विट-

महाराष्ट्रात आज 37 हजार 236 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 549 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 51 लाख 38 हजार 973 वर पोहचली आहे. यापैकी 44 लाख 69 हजार 425 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 76 हजार 398 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 5 लाख 90 हजार 818 रुग्ण सक्रीय आहेत.