Ajit Pawar | X

 

Ajit Pawar:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवारांची (Ajit Pawar) जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे. दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केलेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांचीही संपत्ति आयकर विभागाने सीज केली होती. आता, न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाईल. (Shahaji Bapu Patil: माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर हल्ला; दगडाने कारची काच फोडली)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवे देवेंद्र फडणवीस यांनी कालच त्यांच्या पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. या शपथविधी सोहळ्याला पतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे पी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. अजित पवारांनी कालच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज त्यांची संपत्ती मुक्त करण्यात आल्याचा निकाला जाहीर झाला.

काय आहे नेमकं प्रकरण?

आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशीृ संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त केली होती. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मात्र, याबाबत आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळले आहे. तसेच, अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत.