Lok Sabha Election Results 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election Results 2024) आज मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) युतीला मोठा धक्का बसला आहे. येथे महायुती आघाडी केवळ 19 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. महायुतीबाबत बोलायचे झाले तर येथे सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पक्ष शिवसेनेला बसला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष केवळ 5 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय महायुतीचा भाग असलेला भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांच्या पक्षाची कामगिरी तर त्याहूनही निराशाजनक आहे. अजित पवारांचा पक्ष केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात फुट पडली. त्यानंतर चाळीस आमदारांनी एकनाथं शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. आता राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने आपला कौल दिला आहे. मुंबईत ठाकरेंनी लढलेल्या चारपैकी चार जागा जिंकल्या आहेत. तर महाराष्ट्रातील 21 पैकी 10 जागांवर आघाडी मिळवली आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024 Results: बारामतीमध्ये Supriya Sule विजयी, सलग चौथ्यांदा झाल्या खासदार; वाहिनी सुनेत्रा पवारांचा केला पराभव)
दरम्यान, महायुतीत 15 जागा लढणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह केवळ चौघांना खासदारकी टिकवण्यात यश आलं आहे. यात बुलढाणा, मावळ आणि हातकणंगलेचा समावेश आहे. राज्यात केवळ श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, प्रतापराव जाधव यांनीचं आपली खासदारकी टिकवली आहे. जनतेने दिलेल्या कौलावरून एकनाथ शिंदे गटाला बंडखोरी करणं चांगलचं महागात पडलं आहे का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Results: मुंबईमधील 6 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात, तर अजित पवार गटाला रायगडमधून सुनील तटकरेंद्वारे एक जागा मिळवण्यात यश)
48 जागांसाठी मतमोजणी -
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या सर्व जागांवर मतदान झाले, त्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या ट्रेंडमध्ये महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे, तर महायुती 19 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय अन्य उमेदवार एका जागेवर पुढे आहेत.