Suryakanta Patil Will Join NCP: भाजपला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर?
Suryakanta Patil Will (PC -Facebook)

Suryakanta Patil Will Join NCP: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Elections 2024) भाजप (BJP) ला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्या पुन्हा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात जाणार आहे. सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांता भाजपवर नाराज होत्या. सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा देताना सांगितले की, गेल्या 10 वर्षात खूप काही शिकले. त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचेही आभारी आहोत. हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. (हेही वाचा - Suryakanta Patil Quits BJP: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीचं दिली पक्षाला सोडचिठ्ठी)

तथापी, सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात त्या राज्यमंत्री होत्या. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्रीपदही भूषवले. (हेही वाचा -Congress on Sharad Pawar: 'आम्ही एकत्र बसलो की निर्णय घेतला जाईल'; शरद पवारांच्या विधानसभा निवडणुकीच्या वक्तव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया)

सूर्यकांता पाटील यांची प्रदीर्घ कारकीर्द -

सूर्यकांता पाटील पहिल्यांदा 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसमधून राज्यसभेवर गेल्या. 1991, 1998 आणि 2004 मध्ये त्या तीनदा लोकसभेवर निवडून गेल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राजीव सातव यांना हिंगोलीतून उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारी दुपारी त्या पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.