Congress on Sharad Pawar: 'आम्ही एकत्र बसलो की निर्णय घेतला जाईल'; शरद पवारांच्या विधानसभा निवडणुकीच्या वक्तव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया
Nana Patole (PC - ANI)

Congress on Sharad Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) घोषणा होण्याआधीच राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे (सपा) अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केल्यानंतर विरोधी गोटातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर लढण्याचा करार केला होता. मात्र, यावेळी विधानसभा निवडणुकीत तसे करणार नसल्याचे म्हटले होते.

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य समोर आले आहे. नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, 'नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर अशी भाषणे करावीत, शरद पवारांनी असे विधान केले असेल तर त्यात गैर काहीच नाही...आम्ही एकत्र येऊ तेव्हा जागावाटपावर चर्चा होईल. विधानसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवू.' (हेही वाचा -Nana Patole On BJP: राज्यात भाजप पक्षाचा काउंटडाऊन सुरू; काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य)

काय म्हणाले होते शरद पवार ?

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. यावेळी आमचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही कमी जागांवर लढणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने कमी जागांवर लढण्याची तडजोड केल्याचे पवार यांनी म्हटले होते.  (हेही वाचा -Nana Patole यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतले, Video व्हायरल होताच वादाला तोंड फुटले)

शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात दोन सभा घेतल्या. पहिली बैठक पुणे शहर आणि जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि दुसरी बैठक आमदार आणि नवनिर्वाचित खासदारांसोबत होती. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पहिल्या बैठकीला उपस्थित असलेले पुणे शहर राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख प्रशांत जगताप म्हणाले की, शरद पवार यांनी आम्हाला बैठकीत सांगितले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेसची युती कायम आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत जागावाटपासंदर्भात चित्र वेगळे असेल, असे संकेत जगताप यांनी दिले.