Varavara Rao | (File Photo)

वरावरा राव (Varavara Rao) हे 81 वर्षांचे सामाजिक कार्यकर्ते आणि कवी कोर्टाने जामीन दिल्यानंतर तब्बल 2 आठवड्यांनी कारागृहातून बाहेर आले आहेत. मुंबई येथील नानावटी (Nanavati Hospital) हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. शनिवारी रात्री उशीरा साधारण 11.45 वाजता ते रुग्णालयातूनच बाहेर आले. वरावरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने मेडिकल ग्राऊंडवर जामीन दिला होता. त्यानंतर काही काळाने ते बाहेर आले. भीमा कोरेगाव प्रकरणात ( Bhima Koregaon Case) पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने वरावरा राव यांना नानावटी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. राव यांच्या वकील इंदिरा जयसिंह यांनी ट्विटरवर ट्विट करुन वरावरा राव बाहेर आल्याची माहिती दिली आहे. (हेही वाचा Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणी वरावरा राव यांना जामीन मंजूर)

जामीन मंजुर झाला असला तरी वरावरा राव यांना मुंबई शहरातच थांबावे लागेल. तसेच, चौकशीसाठी केव्हाही बोलावले तर हजर रहावे लागणार आहे. या अटीवरच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरावरा राव हे 82 वर्षांचे आहेत. त्यात त्यांची प्रकृतीही फारशी चांगली नसते. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना तातीडच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती.

वरावरा राव यांच्या पत्नी हेमलात यांनी एक स्वतंत्र याचिका दाखल करुन ही मागणी केली होती. या याचिकेवर प्रदीर्घ काळ सुनावणी झाली. त्यानंतर न्यमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीश पितळे यांच्या खंडपिठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. शिवाय याचिकेवर निर्णय होईपर्यंत वरावरा राव यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातच ठेवण्यात यावे असे सप्ट करण्यात आले होते.

वरावरा राव हे 28 ऑगस्ट 2018 पासून कारागृहात होते. हे प्रकरण 1 जानेवारी 2018 मध्ये पुणे येथील भीमा कोरेगाव लढाईच्या 200 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजिच करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी झालेल्या हिंसाचाराशी संबंधीत आहे. या हिंसाचारात एका व्यक्तिचा मृत्यू झाला होता. तर अनेक लोक जखमी झाले होते.