Bhayandar Building Collapsed: भाईंदरमध्ये इमारतीची भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
Death/ Murder Representative Image Pixabay

भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या सदनिकेची भिंत कोसळली असून यात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. नवघर पोलीस ठाण्यासमोरील श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर एका सदनिके़चे दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि मजुरांना तात्काळ बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाकल केलं, मात्र दोन मजुरांना मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.  (हेही वाचा - Delhi School Bus Caught Fire: दिल्लीत शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या खाजगी बसला भीषण आग, पहा व्हिडिओ)

भाईंदरमधल्या या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून हरिनाम चौहान (वय 55,) आणि मखनलाल यादव (वय 26) अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर आकाश कुमार यादव जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या सदनिकेची भिंत कोसळली असून यात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. नवघर पोलीस ठाण्यासमोरील श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर एका सदनिके़चे दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.

दरम्यान या घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथक हे घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी कामगारांवर उपचार हे सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर देखील असल्याची माहिती मिळाली आहे.