Dr Babasaheb Ambedkar's 129th Birth Anniversary: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चित्र रेखाटून अभिवादन; वडील राज ठाकरे यांच्याप्रमाणे अमित ठाकरे यांचा चित्रकलेकडे ओढ
Amit Raj Thackeray | Photo Credits: Instagram

संपूर्ण भारतात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब यांची जयंती (Dr Babasaheb Ambedkar's 129th Birth Anniversary) जल्लोषात साजरी केली जात आहे. दरम्यान, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अनेक लोकांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन केले आहे. यात कलाकार, राजकीय नेत्यांसह सामन्य लोकांचाही समावेश आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. दरम्यान, अमित ठाकरे यांनी स्वत: डॉ. बाबासाहेबांचे व्यंगचित्र रेखाटून त्यांच्या फेसबूक पेजवर पोस्ट केले आहे. या फोटोला कॅप्शन देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलं आहे. यामुळे त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि वडील राज ठाकरे यांच्या राजकारणासह चित्रकलेचे गुणही अमित ठाकरेंमध्ये उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतेच अमित ठाकरेंनी स्वत: रेखाटलेले पहिलेचे चित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यामुळे सध्या याची अनेक ठिकाणी चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आजोबा आणि वडीलांचे राजकारणासह चित्रकलेचे गुणही अमित ठाकरेंमध्ये उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे.राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

अमित ठाकरे यांची फेसबूक पोस्ट-

 

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्र रेखाटली आहे. तसेच अमित ठाकरे यांनीही अनेकदा व्यंगचित्र काढल्याचे समजत आहे. त्यांनी याआधी त्यांचे वडील राज ठाकरे आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे व्यंगचित्र काढून फेसबूकवर पोस्ट केला होता.