महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

दरवर्षी नियमितपणे 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar’s 129th Birth Anniversary) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यांचा पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हेतर, राज्याबाहेरील लोक मुंबई (mumbai) येथे दाखल होतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस घरातूनच वंदन करावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. यातच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन आहे. तसेच कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी प्रत्येकाने घरातच बसावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्सव साजरा होत आहेत. दरम्यान, जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे जाळे वेगाने पसरत जालले आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. डॉ. बाबासाहेब यांची जयंती साजरी करण्यासाठी दूरदूरवरून लोक मुंबई येथील दादर परिसरात जमतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करावी, असे आवाहन अनेक राजकीय नेत्यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घरातच डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘करोना’ समिती स्थापन; संकट निवारणानंतर राज्याला स्थिरता देण्यासाठी करणार काम

ट्वीट-

तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. दरम्यान ते म्हणाले होते की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या घरातच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करुया. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया”,असे ते म्हणाले होते. त्यानुसार त्यांनीही आज आपल्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले आहे.