Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credits : Facebook)

Corona Committee in Maharashtra: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक बोजा पडला आहे. आर्थिक, औद्योगिक आणि बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटामुळे बसलेल्या धक्क्यातून महाराष्ट्राला सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली एक सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोना समिती ( Corona Committee) असे तिचे नाव. या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश या सात मंत्रिमंडळ सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ही समिती केवळ . आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक पातळीवर सावरणार आहे. तसेच, राज्यात युद्धस्तरावर काम करत आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणांचे मनोधैर्य वाढविण्यासाठीही ही समिती काम करत आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रात 121 नव्या COVID-19 रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,455)

कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. यासोबतच हे संकट निवारण झाल्यानंतर राज्यातील स्थिती अधिक मजबूत बनविण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांशी बोलत आहेत. अनेक सूचना, सल्ला मागवत आहेत. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेला उद्देशून केलेल्या भाषणांमध्येही मुख्यमंत्री अनेकदा या गोष्टींचा उल्लेख करत आहेत.