Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेल्या परिसरात देखील कोरोना रुग्ण वाढत चालले आहे. महाराष्ट्रात आज नवे 121 रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,455 वर जाऊन पोहोचली आहे. हा आकडा इतक्या वेगाने वाढणे हे चांगले संकेत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धारावीतही आज 6 नवे रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 55 वर पोहोचली असून एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

महाराष्ट्रात 2,455 इतके एकूण कोरोना बाधित रुग्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये अशी सूचना वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मुंबई: धारावी मध्ये 6 नवे COVID-19 बाधित, या परिसरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 55 वर

पाहा ट्विट:

भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच यात 1211 नवीन रुग्णांचा समावेश असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.