Bhakti Barve Ghost Story: आपण जवळजवळ सर्वजणच भुताखेतांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो आहोत. लहानपणी भुतांच्या या कथांचा इतका मोठा परिणाम व्हायचा की, आपण अंधारात एकटे जायला घाबरायचो. जीवन आणि मृत्यू यांच्यातील ही सूक्ष्म रेष नेहमीच कुतूहलाचा विषय ठरली आहे. भूत आहे की नाही? याबाबत मतांतरे आहेत. मात्र अस्पष्टीकृत घटना, विचित्र आवाज, विचित्र अनुभव किंवा दृश्ये याबाबत अनेक अनुभव तुम्ही नक्कीच ऐकले असतील. अनेक जागा-ठिकाणे झपाटलेली असल्याचे वाचले असेल. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भाटन बोगदा हे असेच एक ठिकाण. हा बोगदाही झपाटला असल्याचे म्हटले जाते. महत्वाचे म्हणजे या बोगद्याच्या कथांशी भारतीय अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे नाव जोडले जाते.
भक्ती बर्वे या एक लोकप्रिय आणि ख्यातनाम अभिनेत्री होत्या. रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील आपल्या कामांसाठी संपूर्ण भारत त्यांना ओळखत होता आणि अजूनही ओळखतो. दुर्दैवाने, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गजबजलेल्या भाटन बोगद्याजवळ एका कार अपघातात त्यांचा अकाली मृत्यू झाला. आता त्यांचेच भूत या बोगद्यात असल्याचे दावे केले जात आहेत.
भक्ती बर्वे यांचा मृत्यू-
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे एक्स्प्रेस हायवे झपाटलेला असल्याची, लोकांची समजूत आहे. तर 12 फेब्रुवारी 2001 रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भाटन बोगद्याजवळ एका कार अपघातात भक्ती बर्वे यांचे निधन झाले. वाई येथील कार्यक्रम आटोपून त्या मुंबईला परतत असताना ही घटना घडली. त्यांच्या मृत्युनंतर या बोगद्याबद्दल विविध कथा पसरल्या, ज्या आजपर्यंत लोकांना भुरळ घालत आहेत. अनेकांचा विश्वास आहे की, या बोगद्यात भक्ती बर्वेंच्या भुताचा वास आहे (हास्यास्पद ना?). बऱ्याच प्रवासी आणि ड्रायव्हर्सनी, विशेषत: रात्रीच्या वेळी, विचित्र दृश्ये, अंधुक आकृती पहिली असल्याचा, तसेच बोगद्यातून प्रतिध्वनी होणारे रहस्यमय आवाज ऐकल्याचे अनुभव शेअर केले आहेत. अनेक प्रवाशांनी बोगद्यात अचानक थंडी किंवा अस्वस्थता जाणवल्याचा दावाही केला आहे.
पुणे एक्सप्रेस हायवेवर भक्ती बर्वेंचे भूत असल्याचा दावा-
यातील एक विशिष्ट घटना म्हणजे, रात्री बोगद्यातून जात असलेल्या एका ड्रायव्हरला अचानक साडी नेसलेली एक महिला दिसली. ती प्रवासी आहे असे समजून ड्रायव्हरने ट्रक थांबवला. मात्र, अचानक त्याला महिलेचा मोठा आवाज ऐकू आला, ज्यामुळे तो घाबरला. त्यानंतर त्याला चक्कर आली व तो ट्रकवरून खाली पडला. दुसऱ्या दिवशी, पोलिसांना त्याचा ट्रक आणि तो त्याच्या शेजारी मृतावस्थेत पडलेला आढळला. ही कथा लवकरच सर्वत्र पसरली, आणि लोकांचा असा विश्वास बसला की, अभिनेत्रीचा आत्मा तिच्या दुःखाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. आता ड्रायव्हरचा मृत्यू झाला त्यामुळे त्याला महिला दिसल्याचे इतरांना कसे समजले हे नवलंच आहे. (हेही वाचा: Martha Chapel Cemetery: टेक्सासच्या शापित अशा ‘मार्था चॅपल कब्रस्तान’मध्ये मुलीचे भूत? Google Maps Street View मध्ये दिसली रहस्यमय आकृती)
View this post on Instagram
पुणे एक्स्प्रेस हायवे खरोखरच पछाडलेला आहे, असे अनेकांचे मत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये याच्याशी निगडीत कथा सोशल मिडिया किंवा युट्यूब व्हिडीओद्वारे व्हायरल होत आहेत. महत्वाचे म्हणजे सोशल मिडियावर दावे केले जात आहेत की, 2001 मध्ये उघडलेल्या या अपघातानंतर भाटन बोगद्याजवळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. परंतु भक्ती बर्वे यांचे भाटन बोगद्याशी असलेल्या संबंधाचे गूढ अद्यापही उकललेले नाही.