जगामध्ये भूत (Ghost) आहे की नाही, याबाबत दुमत आहे. काही लोक अशा गोष्टींवर छातीठोकपणे विश्वास ठेवतात तर काही लोक याला अंधश्रद्धा मानतात. याआधी अनेकवेळा काही रहस्यमय आकृत्या समोर आल्या आहेत, ज्याला लोकांनी भूत म्हणून व्हायरल केले. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर ऐतिहासिक अशा टेक्सास (Texas) च्या चॅपल (Chapel) मधील एका झाडामागून एक मुलगी डोकावून पाहत असल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. विश्वास ठेवण्यास कठीण अशी ही प्रतिमा चक्क मार्था चॅपल कब्रस्तानच्या (Martha Chapel Cemetery) गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यूमध्ये दिसून आली आहे. हे चॅपल अनेक रहस्यमय किस्से आणि दंतकथांसाठी कुप्रसिद्ध आहे.
चॅपलमधील झाडाच्या कुंपणजवळ मुलीच्या भुताटकीची आकृती दिसत आहे. ही मुलगी झाडामागून डोकावून पाहत आहे. झाडाच्या मागून मुलीचे फक्त डोके दिसत आहे. ही भीतीदायक प्रतिमा दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 साली इंटरनेटद्रवारे पहिल्यांदा समोर आली होती. यूट्यूबवर हा व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला होता. नंतर हा खोटा दावा असल्याचे म्हटले गेले आणि स्मशानभूमीत भूत नसल्याचेही सांगितले गेले. परंतु अमेरिकेचे हे मार्था चॅपल शापित जागा असल्याच्या बर्याच आख्यायिका आणि भीतीदायक कथा जनमानसांत फिरत आहेत, त्यामुळे लोकांनी या प्रतिमेवर विश्वास ठेवला.
पहा व्हिडिओ -
हा व्हिडिओ प्रथम 2018 मध्ये, युट्यूबर, 'द हिडन अंडरबर्ली 2.0' ने शेअर केला होता. ही मूळ क्लिप ज्याने पाठवली होती त्या व्यक्तीला आपले नाव उघड करायचे नव्हते. युट्यूबने त्यावेळी स्पष्टीकरण दिले होते की, हा व्हिडिओ फोटोशॉप केलेला आहे. या व्हिडिओ खाली एका व्यक्तीने कमेंटही केली होती की, गुगल स्ट्रीट व्ह्यू अॅपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शूट करताना त्याची स्वतःची मुलगी त्या झाडामागे लपली होती व तीच यामध्ये डोकावून पाहताना दिसत आहे. अशा प्रकारे कितीही हा व्हिडिओ खोटा असल्याचे भासवून देण्याचा प्रयत्न झाला असला तरी, अनेक युजर्सचा ठाम विश्वास आहे की या कब्रस्तानमध्ये भूत आहे. (हेही वाचा: ही आहेत भारतातील शापित पर्यटनस्थळे; पुण्यातील हे भुताटकी ठिकाण तर आहे जगप्रसिद्ध)
टेक्सासमधील बोडेन रोड (Bowden Road), जो डॅमन्स रोड आणि मार्था चॅपल कब्रस्तान या नावांनीही ओळखला जातो. माहितीनुसार, मार्था चॅपल हे नाव इथे सर्वात प्रथम ज्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले, त्या मार्था पामरच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.