BEST Dussehra Offer: डिजिटल बस प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी बेस्टने दसरा ऑफर (Dussehra Offer) जाहीर केली आहे. तिकीट खरेदीच्या तारखेपासून 9 दिवसांसाठी ही ऑफर वैध असेल. या ऑफरअंतर्गत प्रवासी कोणत्याही बसमध्ये फक्त 19 रुपयांमध्ये 10 ट्रिप करू शकतात. अधिकाधिक मुंबईकरांना डिजिटल तिकिटांच्या सुविधेचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे.
चलो अॅपवर 19 रुपयांचे तिकीट काढल्यानंतर नवरात्रोत्सवात 10 बसफेऱ्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत 19 रुपयांच्या तिकिटात नऊ दिवसांत कधीही फक्त 10 बसफेऱ्यांचा प्रवास प्रवाशांना करता येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.( हेही वाचा -Illegal hoardings in Mumbai: बेकायदेशीर होर्डिंग आणि बॅनरला आळा घालण्यासाठी होर्डिंग्जवर QR Code लावणे बंधनकारक; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश)
बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर वाढवला आहे. सुट्ट्या पैशांमुळे प्रवासी व वाहकात होणारे वाद, तिकिटासाठी वेळेचा अभाव यामुळे बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अमलात आणली आहे. चलो अॅप, स्मार्टकार्डमुळे लाखो प्रवाशांच्या वेळेची बचत होते. तसेच चालक व प्रवाशांमधील होणारे वाद या उपक्रमामुळे खूप कमी झाले आहेत.
#Mumbai: BEST announces Dussehra offer, 10 trips for Rs 19 for Mobile app users. #bestupdates #Mumbaikars #Dussehra #NavratriFestival #Mumbai pic.twitter.com/pwA3bmpLya
— BEST Bus Transport (@myBESTBus) September 25, 2022
असा घ्या ऑफरचा लाभ -
- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी चलो अॅप डाउनलोड करा.
- अॅपच्या ‘बस पास’ विभागात ऑफर शोधा.
- यात ‘दसरा ऑफर’ निवडा.
- येथे तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि 19 रुपये ऑनलाइन पेमेंट करा.
- तुम्ही बसमध्ये चढल्यानंतर, 'Start a trip' दाबा.
- प्रमाणीकरणासाठी तिकीट मशीनवर तुमचा फोन टॅप करा.
यशस्वी प्रमाणीकरण झाल्यावर, तुम्हाला अॅपवरच तुमच्या ट्रीपची डिजिटल पावती मिळेल. हा संपूर्ण व्यवहार कॅशलेस आणि पेपरलेस आहे.