बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस बोंबलला!
परिवहन सेवा (फोटो सौजन्य- फेसबुक)

बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत बोनस मिळणार अशी आशा दाखवून तात्पुरते खूष केले होते. मात्र अजूनही दिवाळी संपली तरीही बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळीचा बोनस मिळालेला नाही आहे. तर 500 रुपयेच फक्त बोनस मिळणार असे 45 हजार कर्मचाऱ्यांना सांगितले गेले.
दिवाळीत बोनस मिळेल या आशेवर असलेला कर्मचारी आता प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करत आहे. तर बोनस न दिल्यामुळे समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा वारंवार कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. तसेच बोनसची मागणी पूर्ण होण्यासाठी बेस्ट समिती आणि प्रशासनामध्ये खूप वाद झाले. अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना फक्त 500 रुपयेच बोनस दिला जाईल असे जाहिर करण्यात आले. मात्र बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत ऐन दिवाळीत दिवाळ निघत आहे असे म्हटले आहे.
बेस्टची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तर मासिक खर्च 650 कोटींच्या घरात जाऊन पोहचत आहे. तर बेस्टवर कर्ज झाले असून इंधन, वेतन या गोष्टींसाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसून अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.