परीक्षा (Photo Credit: PTI)

BEST Strike 2019 : मुंबईच्या बेस्ट प्रशासनाने आजपासून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. वेतनवाढीसाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मात्र यामुळे सामान्य मुंबईकरांची तारांबळ झाली आहे. चाकरमणी मुंबईकरांसोबतच आज मुंबईतील विद्यार्थ्यांना संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. आज परिक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्यास परीक्षा देण्यास मुभा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'बेस्ट बस बंद'च्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 40 जादा गाड्या रस्त्यांवर , मेट्रो, लोकलमध्ये गर्दी

विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबईमध्ये आज लॉ (कायदा) , एम कॉम सह काही विषयांच्या परीक्षा मुंबईत पार पडणार आहेत. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना बेस्ट संपाचा फटका बसू शकतो या पार्श्वभूमीवर वेळेचे नियम थोडे शिथील करावेत याकरिता मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना किमान अर्धा तास उशिरा येण्याची मुदत असते पण बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर आता या वेळेमध्ये थोडी वाढ करून परीक्षा केंद्रावर उशीराने पोहचणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मुभा देण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाने सार्‍या परिक्षाकेंद्रांना आणि महाविद्यालयांना एका पत्रकाद्वारा दिले आहेत.Bharat Bandh, Bank Strike, BEST Strike: मुंबईकरांना 8,9 जानेवारीच्या 'भारत बंद' मध्ये कोणत्या सेवा मिळणार, कशाचा फटका बसणार?

मुंबईकरांची बेस्ट बस ठप्प असल्याने होणारी परवड पाहता तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतून लवकरच दिलासादायक बातमी समोर यावी अशी मुंबईकरांची इच्छा आहे.