Bharat Bandh, Bank Strike, BEST Strike: मुंबईकरांना 8,9 जानेवारीच्या 'भारत बंद' मध्ये कोणत्या सेवा मिळणार, कशाचा फटका बसणार?
मुंबईकरांनो उद्या बेस्ट संपासोबतच भारत बंद आणि बॅंक बंददेखील असल्याने मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
8,9 January Bharat Bandh, Bank Strike, BEST Strike: दरमहा किमान 24,000 रुपयांचे वेतन मिळावे याकरिता 8 आणि 9 जानेवारी या दिवशी कामगारांनी देशभर संप पुकारला आहे. सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी ( Bank Strike) देखील या दिवशी बंदाची हाक दिली आहे. संपाचा निर्णय दिल्लीतील 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि सर्व उद्योगांतील स्वतंत्र संघटनांच्या संयुक्त परिषदेत घेण्यात आला आहे. यासोबतीने मुंबईत बेस्ट कर्मचार्यांनीही (BEST Strike) बंदची हाक दिल्याने उद्या मुंबईकरांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
बॅंक संप -
सरकारने काही दिवसांपूर्वीच विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँक (Dena Bank) या बँकांचे बँक ऑफ बडोदा ( Bank of Baroda) या बँकेत विलिनीकरण केले. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला होता. आता पुन्हा 8 आणि 9 जानेवारी या दिवशी हा बंद असल्याने बॅंक व्यवहार ठप्प राहणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, भारतीय बँक कर्मचारी संघाने संपाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे अलाहाबाद बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, सिंडिकेट बँक, बँक ऑफ इंडियाचं काम बंद राहील. अलाहाबाद बँकेने देखील सेबीला पात्र पाठवून या दोन दिवसात कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. खासगी बँका आणि पतसंस्थेची कामं सुरळीत असतील. ऑनलाईन माध्यमातून व्यवहार खुले राहतील. Bank strike in 2019: नववर्षात बँक कर्मचारी पुन्हा संपावर; 8,9 जानेवारीला बँक व्यवहार ठप्प!
बेस्ट संप -
बेस्ट कर्मचार्यांनी वेतनवाढीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी उद्या (7 जानेवारी) बंदची हाक दिली आहे. मुंबईतील 30 हजार कर्मचारी बेमुदतसंपावर आहेत. राज्य सरकारसोबतची त्यांची बैठक निष्फळ ठरल्याने संप करण्यावर बेस्ट कर्मचारी ठाम आहेत. बेस्ट संपामुळे चाकरमान्यांची वाहतुकीसाठी परवड होणार आहे. उद्या चाकरमान्यांना लोकल सेवा,रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर अशा वाहतुकीच्या इतर सोयींवर अवलंबून रहावे लागणार आहे. NMMT म्हणजे नवी मुंबईच्या मुंबईत सेवा देणार्या बसची सुविधा सुरू आहे. संपामधून मंगळवार रात्री शिवसेनेच्या संघटनांनी पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे बेस्ट बसच्या काही गाड्या आज (9 जानेवारी) मुंबईच्या रस्त्यांवर धावण्याची शक्यता आहे. BEST कर्मचारी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून कोणत्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर ?
केंद्रीय कामगार संघटना संप -
स्टील, ऑईल, खाणी, बंदरं, वाहतूक, वीजसेवा, बॅंक आणि इंश्युरंस सेक्टरमधील संघटना उद्या सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ संप करणार असल्याने संबंधित कार्यालय बंद राहणार आहेत. भारतीय मजदूर संघ मात्र संपामध्ये सहभागी होणार नाही. अंगणवाडी सेविका, माथाडी कामगार ,पोस्ट कर्मचारी बंदामध्ये सहभागी असल्याने त्या सेवा बंद राहतील.
औद्योगिक भारत बंद
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचा या संपाला पाठींबा आहे. संपादरम्यान कारखाने बंद ठेवून सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाईल. कृती समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात धरणं आंदोलन असतील.
शाळा आणि कॉलेज -
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांना संपाच्या काळात सुट्टी देण्यात आलेली नाही. नियमित वेळापत्रकानुसारच शाळा आणि कॉलेज 8,9 जानेवारी दिवशी सुरू राहणार आहेत.
शेतकर्यांसह, कामगार संघटनांनी या संपामध्ये सहभाग घेतला आहे. हा 18 वा राष्ट्रीय स्तरावरील संप आहे. या संपाद्वारा Centre of Indian Trade Unions 12 विविध मागण्या सरकारसमोर ठेवणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2019 06:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

